तुकाराम मुंढेंचा रामदेव बाबांच्या पतंजलीला दणका ! राज्यभरात 73 लाखांचे औषधे जप्त
Tukaram Mundhe- औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.
Tukaram Mundhe action on Divya Pharmacy Patanjali: धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe ) यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्ताचा कारभार हाती घेतल्यानंतर जोरदार कामगिरी सुरू केलीय. त्याचा दणका रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या (Patanjali) दिव्या फार्मसीला बसला आहे. औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954) चा भंग केल्याप्रकरणी आठ ठिकाणी कारवाई करत 73 लाख 24 हजार 656 रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सात जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषधविक्री करणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
असला जज असतो का? आपलं जमत नाही उठा, निघा; आंतरवालीत हाय होल्टेज ड्रामा अन् जरांगे-विखेंची जुगलबंदी
25 मे रोजी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा अस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. त्यानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागामधील अस्थापनांविरुद्ध एकच वेळी अभूतपूर्व अशी धडक मोहीम राबविण्यात आली.
आता कागदी नोटा विसरा, पाकिटात येणार ‘पॉलीमर’ नोटांचं बंडल?; RBI मोठ्या निर्णयाच्या विचारात
त्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आयुर्वैदिक औषधांच्या वापरणे गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम किंवा प्रतिबंधित दावे करणाऱ्या भ्रामक जाहिराती प्रसारिक केल्या जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले होते. त्यानंतर औषध निरीक्षकांनी राज्यभरात विविध आजारांच्या उपचाराबाबत औषधांवर असलेल्या आक्षेपार्ह दाव्यांबद्दल कारवाई केली.
कुठे किती साठा जप्त ?
नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागात दिव्य फार्मसी कंपनीच्या 73 लाख 24 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिव्या फार्मसी कंपनी ही हरिद्धार (उत्तराखंड) येथील आहे. नागपूरमध्ये 7 लाख 26 हजार, नाशिकमध्ये 7 लाख 10 हजार, पुण्यात 14 लाख 68 हजार, मुंबईत 1 लाख 85 हजार 600 रुपये, कोण विभागात 18 लाख 58 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर अमरावतीमध्ये 1 लाख 42 हजार 229 किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 48 हजार, पुणे विभागात 21 लाख 83 हजार 428 रुपयांचा आयुर्वैदिक औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई-तुकाराम मुंढे
याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पडू.