Uday Samant : अजित पवारांनी पूर्णविराम नाही स्वल्पविराम दिलायं…

Uday Samant : अजित पवारांनी पूर्णविराम नाही स्वल्पविराम दिलायं…

अजित पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला तरी माझ्या दृष्टीने हा स्वल्पविराम असल्याचं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी उधाण आलं होतं. अखेर आज विधानभवनातून अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय.

Baloch : ‘खुळ्या जीवाला आस खुळी’; योद्धाच्या प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘बलोच’मधले पहिले प्रेमगीत प्रदर्शित

उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले, जशी भूमिका संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी घेतली होती. अगदी तशीच भूमिका आम्ही घेतली होती. शेवटी हा विचारधारेचा प्रश्न आहे. अजित पवार राष्ट्रवादीत राहणार असतील नसतील पण आम्ही जी विचारधारा स्वीकारली तीच त्यांनी स्वीकारावी, अशी आमची भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हंटलय.

Sushama Andhare : भाजपकडून जाणीवपूर्वक मविआमध्ये मिठाचा खडा टाकतयं

तसेच जर अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असतील तर त्यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. सामंत यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवार भविष्यात भाजपमध्ये जाणार असल्याचं संकेतच दिलं असल्याचं दिसतंय.

Samantha Ruth Prabhu: “सामंथाचं करिअर संपलंय, ‘या’ निर्मात्याचा मोठा खुलासा

उदय सामंतांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. मुखपत्रातून सर्वच पक्षांवर संपादकांकडून टीका केली जात आहे. ही पूर्वीपासूनची खदखद महाविकास आघाडीत असल्याचं सामंतांनी स्पष्ट केलंय. ही टीका कोण करतंय हे आम्हालाही कळत नव्हतं आता ते कळत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करत असताना प्रवक्त्यांबाबत टोलेबाजी केली. त्यांचा हा टोला कोणाला होता हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे होतं, मात्र, आज जरी त्यांनी पूर्णविराम दिला असला तरी आमच्या दृष्टीने हा स्वल्पविराम असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube