अखेर ठाकरेंनी भाजपला भगदाड पाडलचं; रविवारी सावेंना धक्का देत होणार ‘मेगा इनकमिंग’

  • Written By: Published:
अखेर ठाकरेंनी भाजपला भगदाड पाडलचं; रविवारी सावेंना धक्का देत होणार ‘मेगा इनकमिंग’

छ.संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे. याचाच एक भाग म्हणून अनेकजण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटी घेत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमध्येच आता उद्धव ठाकरेंच्या पत्रात येत्या रविवारी (दि.7) अतुल सावे आणि भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, भाजपचे 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. (BJP Ex Corporator Join Thackeray Group) 

Video : अजितदादांचा मूड बदलला! वडेट्टीवारांंसाठी खास शायरी अन् खळखळून हसलं सभागृह…

येत्या रविवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, याच मेळाव्यात ठाकरेंनी भाजपला दे धक्का पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे. या मेळाव्यात भाजपचे 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक भाजपला जय महाराष्ट्र करून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

अतुल सावेंना मोठा धक्का

ठाकरे गटाच्या या मेळाव्यात भाजपचे जे माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत ते सर्वजण अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हा सावे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद 

भाजपचे राजू शिंदे छ. संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. तर, संजय शिरसाठ या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे. हीच बाब लक्षात घेत शिंदेनी ठाकरेंच्या पक्षात जाण्याचा निश्चित केल्याचे बोलले जात आहे.

बोलणी फिस्कटली, निवडणूक लागली… : 12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान

लोकसभेत ठाकरेंच्या सभांवर सभा

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जानेवारी महिन्यापासून प्रचार करण्यास सुरुवात केली होती. प्रचारादरम्यान एकूण 105 सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या. त्याचा परिणामही दिसून आला होता. त्यानंतर आता ठाकरेंनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंनी आता मेळावे घेण्यास सुरूवात केली असून, ‘शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार’ या घोषवाक्याखाली 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे.

विधानपरिषद निवडणूक! घोडेबाजार करायचा असेल तर उमेदवार ठेवा; फडणवीसांनी सुनावलं…

या मेळाव्यात मराठावाड्यातील हजोरो शिवसैनिक सहभागी होणार असून, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार, प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावेत यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिह्यात शिवसेनेने सहा विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या, परंतु दोन वर्षांपूर्की यातील पाच जणांनी गद्दारी केली आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी जिह्यात पुन्हा सहा जागा जिंकून आणण्यासाठी या मेळाव्यादरम्यान संकल्प केला जाणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज