महाविकास आघाडी सरकारबद्दल फडणवीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, मला अटक…

महाविकास आघाडी सरकारबद्दल फडणवीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, मला अटक…

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक घटनांबाबत वारंवर भाजपकडून नवनवीन खुलासे करण्यात येत असतात. (Arrest plan) यामध्ये भाजपमधील अनेक नेते वेगवेगळे दावे प्रतिदावे करतात. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. (Mahavikas Aghadi) एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांनी हा दावा केला आहे.

 

तुरुंगात टाकण्यात येणार होतं

या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असा खळबळजनक दावा केला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवासांपूर्वी माढ्यात प्रचार सभेत बोलताना, महिआच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्यात येणार होतं असा दावा केला होता. त्याच्या संदर्भाने फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिलं आहे.

 

अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं

पण इतर पोलिसांनी सहकार्य केलं नाही

महाविकास आघाडीच्या काळात अनेक नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न होता असं वारंवार बोललं जात. त्यावर बोलताना फडणवीस यांनी मला कोणत्यातरी प्रकरणात अडकवण्याचा खूप प्रयत्न झाला. तसंच, माझी कसून चौकशीही झाली. मात्र, काहीच सापडलं नाही. त्यानंतर खोट्या केसेस टाकण्यासाठी पोलीस आयुक्तांना आणून बसवलं पण इतर पोलिसांनी सहकार्य केलं नाही असा थेट खुलासा फडणवीसांनी यावेळी केला.

 

तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही,विरोधकांना पोपट म्हणत फडणवीसांचा हल्लाबोल

अडीच वर्षाच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका काढा

यावेळी फडणवीसांनी राजकीय विषयावरही भाष्य केलं. ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यासंदर्भात विचारलं असता फडणवीस म्हणाले, ठाकरे गट अमेरिकेचा अध्यक्षही आपला होईल असा अहवाल करू शकतात. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे असं फडणवीस म्हणाले. तसंच, ठाकरे यांनी अगोदर त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका काढावी असं आव्हानही त्यांनी यावेळी ठाकरेंना दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube