Unseasonable rain : पुणे, नाशिकमध्ये ‘मुसळ’धार; पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस…

पुणे, नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवलीयं.

rain update

Unseasonable rain : पुणे आणि नाशिक जिल्ह्याला काल गुरुवारी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलायं. दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसामुळे (Unseasonable rain ) अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. तर मुंबईतही काही प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झालीयं. पुढील 24 तासांत ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलायं.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झालीयं. याच भागात 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. अखेर काल पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत चांगलाच धुमाकूळ घातलायं.

दरम्यान, उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिक छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवत नाहीत. मात्र अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुण्यातील हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही माहिती समोर येत आहे. पुण्यात जवळपास एक तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची लगबग

अवकाळी पावसाने पहिला बळी…
अवकाळी पावसाने पुण्यात पहिला बळी घेतला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवर झाड कोसळले. पु. ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिराजवळील ही घटना घडली. झाड कोसळून तिघेजण अडकले होते. यामधील एका महिलेचा झाडाखाली दबून मृत्यू झाला तर दोघांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले.

follow us