राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

Unseasonal Rain राज्यावर पावसाचं संकट राज्यावर कायम आहे. कारण हवामान विभागाने आज पुन्हा 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

Maharashtra Rain Alert

Unseasonal Rain continues to wreak havoc in the state Yellow alert for 16 districts, next 48 hours are dangerous : राज्यभारामध्ये सध्या ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केला आहे. याचा मोठा फटका काढलेला पिकांसह फळबागांना बसलाय. त्यानंतर देखील राज्यावर पावसाचं संकट राज्यावर कायम आहे. कारण हवामान विभागाने आज पुन्हा 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर करायलाच हव्या या 5 चाचण्या अन्यथा…

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चार एप्रिलला महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडाट, मेघकर्जना आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाचे वादळे वारे यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागाला गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिवमध्ये ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. विदर्भात देखील अवकाळीचं संकट कायम आहे. यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बार्शी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहून मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

आंबा उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता

दरम्यान मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ, जोरदार वारा आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विशेषतः आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. (Marathwada) नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर यावर्षी आंबा उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता असल्याची माहिती हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

follow us