ब्रेकिंग : वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्हात ओळख आहे.
वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या गच्छंती नंतर राष्ट्रवादीचे महिला परदेशाध्यक्ष पद होतं रिक्त झाले होते. मुंबईत आज सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांना नियुक्तीपत्र दिले. वैशाली नागवडे या मुळच्या दौंडच्या असून अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.
अजितदादांच्या विश्वासूव कार्यकर्त्या
अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्हात ओळख आहे. नागवडे यांना अजित पवार यांना महानंदा दूधच्या चेरमन पदाची धुरा देखील सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात नागवडे यांचे महिला कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. पक्षात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेतल्याने वैशाली नागवडे या चर्चेत होत्या