शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले 52 रुपये; ‘रक्कमेवर दरोडा पडेल, पोलीस संरक्षण द्या…’

  • Written By: Published:
शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले 52 रुपये; ‘रक्कमेवर दरोडा पडेल, पोलीस संरक्षण द्या…’

Crop Insurance : आर्थिक अडचणीत असलेलल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्‍य सरकारच्‍या वतीने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम (Crop Insurance) देण्यात येतो. यंदा निसर्गाने साथ न दिल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालं. या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीक विम्याची रक्कम जखमेवर मोठ चोळणारी ठरली आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपये, तीन रुपये रक्कम जमा केल्याच्या अनेक घटना उघडकीस झाल्या. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी दिलीप राठोड यांच्यासोबत घडला.

प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण थक्क करणारं 

दिलीप राठोड यांना 52 रुपये 99 पैसे परतावा मिळाला. यामुळं उपहासात्मक टीकी करत त्यांनी राज्य सरकारकडे पीक विम्याच्या रक्कमेवर दरोड पडण्याचाी भीती व्यक्त करत पोलीस संरक्षण मागितले. राठोड यांनी थेट पोलिस अधिक्षक यांनी पत्र लिहिलं,.

प्रति,
मा पोलिस अधीक्षक साहेब
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ
विषय: पिकविम्याची रक्कम 52 रुपये 99 पैसे घरी नेतांना दरोडा पडण्याची भिती असल्याने पोलीस बंदोबस्त पुरविणेबाबत.

महोदय,
दिलीप वामन राठोड
रा. शिवणी ता. कारंजी जि यवतमाळ
मी पीक विमा धारक शेतकरी आहे. मौजा शिवणी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथील रहिवाशी आहे. मी आपणास नम्र निवेदन करतो की, या वर्षांच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला 52 रुपये 99 पैसे इतक्या रक्कमेचा भरीव पीकविमा मंजूर केल्याने मी खुप खुप खुश व आनंदीत झालो आहे. सदरची रक्कम माझ्या सारख्या एका गरीब शेतकन्यासाठी 50 खोक्यापेक्षाही मोठी असल्याने या रक्कमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. शिवाय बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेस मधून नेणे मला शक्य नसल्याने वडिलोपार्जीत तिजोरी व बैलबंडी आणली आहे.

Ajinkya Nanavare: नाटकानंतर ‘सोंग्या’ मधून अजिंक्य ननावरे लक्षवेधी भूमिकेत 

रुपये 52.99 इतक्या मोठ्या रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझया पीकविम्याच्या रुपये 52.99 वर लागली आहे. माझ्यासाठी ही रक्कम अतिशय महत्वाची आहे. यंदा पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून दिडीतिडीने घेतलेले कर्ज पिकविम्याच्या या पैश्यातून सर्वप्रथम फेडीन, उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन. तब्येत बरी नसतांनाही शेतात काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला दवाखान्यात नेईन. गेल्या अनेक महिन्यांपासून फाटक्या पॅंटेत शाळेत जाणाऱ्या पोराला कपडे घेईन.

वयात आलेल्या मुलीचे घुमधडाक्यात लग्न करीन. अन् पूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहातीला जाऊन येईल आणि संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकन्यांच्या आयुष्यात भरभराटी निर्माण करणान्या देशी विदेशी महागडा गाडयांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री ना. संजय राठोड यांना भरीव आर्थिक देणगी देईन व उरली सुरली रक्कम तिजोरी सांभाळून ठेवीन. म्हणून पीकविम्याची ही मदत माझ्या व माझ्या कुटुंबासाठी खुपच महत्वाची आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम घरी नेतांना रस्त्यात लुटमारीची प्रचंड भिती वाटत असल्याने आपण मला पीकविमा रक्कमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलीस पुरवावे, ही विनंती.

दरम्यान, राठोड यांना पीक विम्याची मिळालेली तुटपूंजी रक्कम म्हणजे पीक विमा कंपनीने आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची केलेली थट्टाच आहे, असा सुरू शेतकरी करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube