कायद्याचा श्वास रोखाल तर आमच्यात हात तोडण्याचं सामर्थ्य; बच्चू कडुंनी थेट धमकावलंच

कायद्याचा श्वास रोखाल तर आमच्यात हात तोडण्याचं सामर्थ्य; बच्चू कडुंनी थेट धमकावलंच

Bachhu kadu News : कायद्याचा श्वास रोखाल तर आमच्यात हात तोडण्याचं सामर्थ्य, या शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी थेट महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसह (Navneet Rana) भाजपला धमकावलं आहे. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल अमरावतीत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. अखेर बच्चू कडू यांना परवानगी नाकारण्यात आल्याने प्रहारचे उमदेवार दिनेश बुब यांना आज सभा घ्यावी लागली. या सभेत बोलताना बच्चू कडूंनी जोरदार प्रहार केला आहे.

मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मोठा धक्का; जवळच्या मित्राची 73.62 कोटींची मालमत्ता जप्त

बच्चू कडू म्हणाले, 23 तारखेला निवडणूक आयोगाकडे आमचा कार्यकर्ता गेला होता. राणा यांचा मंडप काढण्याबाबत त्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, हे मैदान देता येणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आम्हाला जाहीर सभा घेण्याबाबतची परवानगी देण्यात आलेली होती. मात्र ऐनवेळी परवानगी नाकारुन भाजपच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. हे लोकं कायदा तोडणारे आहेत. राणा भाजपची संस्कृती विसरले आहेत. कालच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडू हे आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी रितसर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत कडू यांची सभा रद्द करत तेथे अमित शाह यांच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच आंदोलन पुकारलं होतं.

देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय

अमित शाह यांची सभा होणार असल्याने येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होतं. दरम्यान, बच्चू कडू यांची सभा होणार असल्याने ते कार्यकर्त्यांसोबत सभास्थळी आले असता, कडू यांना आत जाण्यापासून रोखलं. त्यावर कडू यांनी आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी आहे तरी आपण का अडवता असं विचारलं. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यावरून कडू संतापले. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखी आमची समजूत का घालत आहेत असा थेट प्रश्न कडूंनी यावेळी पोलिसांना केला. त्याचबरोबर अमित शाह यांच्या सभेसाठी परवानगी मिळाली असेल तर ती दाखवावी अन्यथा आम्हाला सभा घेऊ द्यावी, असा आग्रह कडून यांनी यावेळी केला. मात्र, पोलिसांनी कडू यांना पुढे जाऊ दिलं नाही.

दरम्यान, अमरावतीत काल जाहीर सभेवरुन मोठा राडा झाल्यानंतर आज अमरावती मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांची सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातून प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube