Eknath Shinde : संजय राठोडांना ‘त्या’ प्रकरणात आम्ही वाचवलं

  • Written By: Published:
Eknath Shinde : संजय राठोडांना ‘त्या’ प्रकरणात आम्ही वाचवलं

वाशीम : पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan case) संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, मी आणि देवेंद्र फडणवीस मात्र, संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे सांगितले. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

Pune News : कोश्यारी राज्याबाहेर गेले; राष्ट्रवादीने वाटले पेढे.. 

बंजारा समाजाची‎ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या‎ पोहरादेवी येथे ५९३ कोटी रुपयांच्या‎ विकासकामाचे भूमिपूजन व संत‎ सेवालाल महाराजांचा पंचधातूंच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सर्वांत मोठ्या सेवाध्वजाची स्थापना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान, विदर्भातील बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते संजय राठोड मविआ सरकारमध्ये असताना त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप होते. पूजा चव्हाण प्रकरणात भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यामुळे राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. परंतु नंतर त्यांना पुणे पोलिसांनी याप्रकरणी क्लिनचिट दिली होती आणि सत्तांतर झाल्यानंतर राठोड पुन्हा मंत्री झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पोहरगडावरून ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. पूजा चव्हाण प्रकरणात काही जणांनी हात वर केले. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे-घेणे, असा विचार आम्ही केला नाही. तो आमचा आहे. आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube