‘नागपूर माझा मतदारसंघ, संधी दिली असती तर जिंकलोही असतो’; काँग्रेस नेत्याचं पोटातलं ओठावर आलंच

‘नागपूर माझा मतदारसंघ, संधी दिली असती तर जिंकलोही असतो’; काँग्रेस नेत्याचं पोटातलं ओठावर आलंच

Nitin Raut comment on Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात महाविकास आघाडीने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. कोण किती मतांनी जिंकणार याचीच चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘मला नागपुरातून संधी दिली असती तर मी नक्कीच निवडणूक लढवली असती आणि जिंकूनही दाखवली असती’, असे वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. नितीन गडकरींचा पाच लाख मताधिक्याचा दावा दिवास्वप्न ठरेल आणि हा मतदारसंघ काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर

नितीन राऊत विकास ठाकरे यांना पाठिंबा देत त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. तरी देखील लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी बोलून दाखवली. नागपूर हा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून लढण्याची माझी मानसिक तयारी होती. रामटेकची जागा मी कधीच मागितली नव्हती, असेही  राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

गडकरी उत्तर नागपुरात तीस हजारांच्या मताधिक्याचा दावा करत असले तरी उत्तर नागपुरात यंदा काँग्रेस 50 हजारांचे मताधिक्य घेईल अशी परिस्थिती आहे. शहरातील मोजक्याच भागाचा विकास करणे म्हणजे सर्मसमावेशक विकास असे होत नाही. नागपूर शहरातील अनेक भागांचा विकास नितीन गडकरींच्या काळात झालेला नाही, असा आरोप नितीन राऊत यांनी केला.

..म्हणून Nitin Gadkari यांचं सुप्त आकर्षण वाटत; जयंत पाटलांकडून गडकरींवर स्तुतीसुमनं 

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज