Maharashtra Politics : पवारांच्या राजकारणापासून परिवारही सुटला नाही; बावनकुळेंचं टीकास्त्र
Sharad Pawar vs Chandrashekhar Bawankule : ‘पवार साहेब मग तुम्ही शिवसेनेबरोबर जाऊन मोठे झालात का? उद्धव ठाकरेंसोबत जाऊन तुम्ही मोठे झालात का? काही काळ तुम्ही सत्तेत आलात पण आज काय परिस्थिती आहे? ना पक्ष राहिला, पक्षातील निष्ठावान लोक बाहेर चालले. तुमच्या पक्षाची स्थिती केंद्रात चांगली नाही. राज्यातही तीच परिस्थिती आहे. आता तर इतकी वाईट परिस्थिती आहे की परिवारही तुम्हाला सोडून चाललाय, यापेक्षा आणखी वाईट दिवस काय पाहिजे?, त्यामुळे भाजपवर आरोप करण्यापेक्षा पवार साहेबांनी आत्मचिंतन करावं. पवार साहेबांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा, त्यांचं घर सांभाळावं, भाजपबद्दल बोलणं बरोबर नाही’, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
NCP : तुम्हाला काय कमी केलं होतं? मिळालेली पदं सांगत रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी टीका करत जे भाजपबरोबर गेले ते संपले असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, ‘शरद पवारांनी वेळोवेळी वेगळ्या भूमिका घेतल्याने पक्ष अडचणीत आला तसेच विश्वासार्हताही कमी झाली. परिवारात सुद्धा पवार साहेबांना वारंवार खोटं बोलाव लागलं. त्यामुळे अजित पवार यांनी जी भूमिका घेतली आहे ती राज्य आणि देशहिताची आहे. अजित पवार यांनी काल आपल्या भाषणात जे काही मुद्दे मांडले. त्यांनी स्वतः सांगितले की मी पवार कुटुंबातील आहे त्यामुळे मी खोटं बोलणार नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे.’
अजितदादांनी 90 जागा लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘जागावाटपाबाबत अजून काहीच चर्चा नाही. निवडणुका जाहीर होत नाहीत तोपर्यंत निर्णय होत नाही. आज निवडणुका नाहीत त्यामुळे सध्या माझ्या दृष्टीने या मुद्द्याला महत्व नाही.’
NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…
आमच्यात कोणतीच धुसफूस नाही, सरकार मजबूत
शिंदे गटात अस्वस्थता आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘काल मी शिंदेंशी बोललो. ते नागपूरला आले होते. राष्ट्रपतींचे स्वागत केले. नंतर ते मुंबईला गेले. एखाद्या वेळी पक्षाची बैठक असेल. म्हणून ते गेले असतील. मात्र, आमच्यात कोणतीच धुसफूस नाही. मनभेद, मतभेद नाहीत. सरकार मजबूत आहे’, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.