खासदार नवनीत राणा-आमदार रवी राणांचा खास ‘Valentine Day’
अमरावती : आज व्हॅलेटाईन्स डे (Valentine Day). तरुण-तरुणाई आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतात. तरुणाबरोबर विवाहित जोपपेदेखील हा दिवस साजरा करतात. त्यात अनेक राजकारण्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. राजकारणातील व्यापामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आपला खास व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला आहे.
रवी राणा यांनी नवनीत राणा यांना कॉफी सेंटरमध्ये बोलावलं. त्याठिकाणी दोघांनीही एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. त्यानंतर दोघांनीही कॉफी घेतली. यावेळी राणा दाम्पत्यांनी तरुण-तरुणींना सल्ला दिला. नवनीत राणा यांची नाराजी मी कॉफीने दूर केली, असं रवी राणा म्हणाले आहेत.
Pune Bypoll election : कसब्यात ‘या’ दोन दिवशी, ड्राय डे !
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जोडीची राज्यभरात कायमच चर्चा होत असते. आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपला व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला आहे. आज रवी राणा यांनी आपल्या मतदारसंघातील कामे आटपून आपल्या प्रेयसीसाठी वेळ काढला आहे. आमदार असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी कायम बाहेर जावं लागतं, आपल्या प्रेयसीला वेळ देता येत नाही, म्हणून आज त्यांनी नवनीत राणा यांना फोन कॉलद्वारे एका कॉफी सेंटरमध्ये तत्काळ बोलावून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Delhi Murder case : दिल्ली पुन्हा हादरली, श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती
तर काहीतरी काम असेल असं म्हणतं नवनीत राणाही कॉफी सेंटरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या हातात गुलाबांच फुल देतं व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर नवनीत राणा यांनी देखील रवी राणा यांना गुलाबाचं फुल देतं शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दोघांनीही आपण राजकीय नेते आहोत हे विसरत एकमेकांना वेळ दिल्याचं दिसून आलंय.
एकमेकांना दिल्या शुभेच्छा
आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं या दोघांनी एकत्र येण्याचे ठरविले. तसे तर दोघेही आपआपल्या कामात व्यस्त असतात. आमदार आणि खासदार दाम्पत्य लोकांमध्ये मिसळतात. त्यांचे प्रश्न समजून घेतात. त्यासाठी लढाही देतात.
आमची रामदेव बाबांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच भेट झाली होती, त्यानंतर आमची मैत्री आणि मग प्रेमविवाह झाल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या तरुण -तरुणींनी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच आपल्या प्रेमविवाहाचा निर्णय घ्यावा, कुठल्याही परिस्थितीत आईवडिलांचं मन दुखावू नका, असं आवाहन रवी राणा यांनी प्रेमीयुगुलांना केलं आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्यांच्या प्रेमविवाहाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच रंगत असते. अशातचं दरम्यान, राजकीय जीवनात काम करताना व्यस्त शेड्यूल असतानाही राणा दाम्पत्यांनी आज व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला असून तरुण-तरुणींनी कुटुंबियांना विश्वासात घेऊनच आपल्या आयुष्याचा निर्णय घेतला पाहिजे असा संदेश राणा दाम्पत्यांनी दिला आहे.