अधिवेशन तीन आठवड्यांचे व्हावे; अजित पवार ठाम
नागपूरः हिवाळी अधिवेशनात दोन आठवड्यांचे कामकाज झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन हे संपूर्ण तीन आठवडे होणे आवश्यक असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
दोन आठवड्यापासून अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारांना घेरले आहे. कर्नाटक सीमावाद, सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी जोरदार भाषण करत विरोधकांना चांगलेच चिमटे काढले आहेत. हे अधिवेशन येत्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे.
त्यावर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे तीन आठवडे अधिवेशन झाले पाहिजे. मंगळवारी उशीरापर्यंत विधिमंडळाचे कामकाज करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार रात्री ११ वाजेपर्यंत कामकाज झालेले आहे. हे अधिवेशन आणखी एक आठवडे चालले पाहिजे. त्यासाठी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवाद व इतर सहयोगी पक्षाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईला येत आहे. त्यासाठी काँग्रेसचे आमदारला मुंबईला जाणार आहेत. त्यानंतर लगेच ते विमानाने पुन्हा नागपूरला येऊन अधिवेशनात भाग घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.