भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र

  • Written By: Published:
भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र

Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.

धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? 

या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी काय करायला हवं,असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले की, भुतानच्या पंतप्रधानांनी युनोमधील आपल्या भाषणात काही मुद्दे सांगितले होते. डोमेस्टिक हॅपी इंडेक्सवर बोलतांना ते म्हणाले, प्रत्यके गावात रस्ता पाहिजे. शुध्द पाणी, घरं, उत्तम, शिक्षण, आरोग्या सुविधा हव्यात. यातून आनंद मिळतो. मात्र, माणूस हा महत्वकांक्षी असतो. जो नगरसेवक असतो, त्याला आमदार व्हायचं असत. आमदाराला मंत्री व्हायचं असतं. जो मंत्री असतो, त्याला चांगलं खातं हवं असतं. ज्याला खातं मिळतं, त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं. मुख्यमंत्री कायम चिंतेत असतो, की आपल्या हायकमांड ठेवते की, काढते याची भीती त्याला असते. मात्र, माणसांने भविष्याबद्दल विचार करू नये. देवां औकात आणि हैसियतपेक्षा जास्त दिलं असं मानलं तर आपण आनंदी राहतो, हे जास्त महत्वाच आहे, असं गडकरी म्हणाले.

मुळात आयुष्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आपण सतत काम करत राहावे. प्रयत्न करत राहावं, मला हेच करायचे आहे, अशी भावनाही ठेवावी. पण मिळालं किंवा नाही मिळालं, याचा जास्त विचार करू नये. भविष्याचा विचार न करणं हा हा आनंदी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वांना एक विनंती आहे की, भविष्याचा विचार करणे सोडून द्या. गीता काय म्हणते, यावर विश्वास ठेवा. जो जो होनेवाला है, वो होता रहेगा… खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे, असं गडकरी म्हणाले.

तुम्ही काही महिने एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना आणि अंतिम टप्प्यात अडथळे आल्यावर तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांनी मला एक वस्तू भेट दिली. त्यांनी दिलेल्या गिफ्टवर लिहिलं होत की, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थींग्ज डन. ते म्हणाले की, मला प्रॉब्लेम नको सांगूस, काम झालं पाहिजे. ही गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवली, असं गडकरी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube