प्रकाश पोहरेंची विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, तालिका अध्यक्षांनी दिले कारवाईचे आदेश

  • Written By: Published:
प्रकाश पोहरेंची विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, तालिका अध्यक्षांनी दिले कारवाईचे आदेश

नागपूर : काल लोकसभेचं अधिवेशन सुरू असतांना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या सदनात उड्या मारल्या आणि सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून धूर केला. त्यामुळं संसद सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही घटना ताजी असतांनाच आता विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन प्रकाश पोहरे (Prakash Pohre) (देशोन्नतीचे संपादक, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष) यांनी आमदारांना दमदाटी केली. त्याचबरोबर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं सभागृहात गोंधळाची स्थिती तयार झाली होती. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश तालिका चेतन तुपे यांनी दिले आहेत.

‘पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री म्हणूनच..,’; फोटोसेशनवरुन आदित्य ठाकरेंची जहरी टीका 

सध्या नागपूरात राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आज सायंकाळी कामकाज सुरू असतांना पत्रकार गॅलरीतून प्रकाश पोहेर यांनी आमदारांना दमदाटी केली. भाजप आमदार आशिष शेलार यांचं निवेदन सुरू होण्याआधीच पोहरेंनी विदर्भातील प्रलंबित प्रश्नांवरून आमदारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं सदनात गदारोळ झाला. त्यावर आशिष शेलार यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.

Shahrukh Khan : डंकीच्या प्रदर्शनाआधी शाहरुख मुलगी सुहानासह साई चरणी, शिर्डीत चाहत्यांचा जल्लोष 

शेलार म्हणाले, काल संसदेत घडलेल्या घटनेनंतर विधानसभेच्या पत्रकार गँलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पोहरे यांना बाहेर नेण्याचे आदेश पीठासीन अध्यक्ष तुपे यांनी सरक्षा रक्षकांना दिले. विधानसभा पत्रकार गलरीत घोषणाबाजी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असंही तालिका अध्यक्ष तुपे म्हणाले.

प्रकाश पोहरेंची प्रतिक्रिया-
या प्रकारानंतर प्रकाश पोहरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मागील तीन दिवसांपासून आरक्षणावर चर्चा केली जाते. मात्र, ही चर्चा काही संपतच नाही. अजूनही 40-50 आमदारांना यावर प्रश्नांवर बोलणार असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळं उद्याचा दिवसही हे आरक्षणावरच बोलणार… 15 दिवसाचं अधिवेशन आहे. त्यात चार सुट्टीचे दिवस गेले. उरलेल्या दहा दिवसात हे अन्यच विषय बोलत आहेत. विदर्भातील प्रश्नांवर काहीच चर्चा होत नाही. विदर्भात रोज शेतकरी आत्महत्या होतात. अवकाळी पावसामुळं शेतकरी खचला आहे, मात्र, त्यावर कोणीही बोलत नाही. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करा, असं अधिवेशनाआधी सांगूनही इथल्या प्रश्नांना बगल दिली जाते, असं पोहरे म्हणाले. यावेळी त्यांनी विदर्भातील आमदारांवर टीकाही केली.

आपल्यावर कारवाई करण्याची मागणी होतेय, याविषयी विचारले असता पोहरे म्हणाले की, माझ्यावर कारवाई करा, हक्कभंग दाखल करावा.. मला काहीही फरक पडत नाही, असं ते म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube