Video : मोदींनी आता काश्मीर पंडितांची गॅरेंटी घ्यावी; ठाकरेंचा मार्मिक टोला
Uddhav Thackeray On Article 370 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वागत केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्मिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरबाबत आज (दि.12) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे ठाकरे म्हणाले. मात्र, सध्या गॅरेंटीचा जमाना आहे. त्यामुळे आता मोदींनी काश्मीरी पंडित पुन्हा घरी परततील आणि ते मतदान करतील याची गॅरेंटी घ्यावी असा खोचक सल्ला दिला आहे.
कांदा अन् ऊसाच्या दरावर PM मोदींचे घाव! दगाफटका टाळण्यासाठी फडणवीस-अजितदादा अॅक्शनमध्ये
ठाकरे म्हणाले की, आर्टिकल 370 हटवल्यानंतरदेखील आम्ही समर्थन केले होते. आणि आज सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्याचेदेखील मी स्वागत करतो. आता पुढच्या सप्टेंबरपर्यंत तेथे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या निवडणुका लवकरात लवकर होतील अशी आशा आहे. तेथील जनतेला खुल्या हवेत मतदान करण्याची संधी मिळेल आणि मिळाली पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
सिद्धरामय्यांची अवस्था ठाकरेंसारखी होणार! कर्नाटकात लवकरच 60 आमदारांसह ऑपरेशन लोटस
काश्मिरी पंडितांबद्दल काय म्हणाले ठाकरे
काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, काश्मीरी पंडितांचा जो विषय आहे, त्यांच्याबाबत कोण गॅरेंटी देईल? असा सवाल उपस्थित करत सध्या गॅरंटीचा जमाना आहे. त्यामुळे काश्मिरी पंडित परत येतील, याची गॅरंटी मोदी देतील का? हे आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कश्मिरी पंडितांना जबरदस्तीने घर सोडावं लागलं. तेव्हा एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. आता मोदी ही गॅरंटी घेतील का? की देशभर पसरलेले हे काश्मिरी पंडित हे निवडणुकीसाठी मतदान करायला आपापल्या घरी परत येतील आणि खुल्या वातावरणात तेथील निवडणुकीत निवडणूक करतील याची गॅरंटी मोदींनी घ्यावी अशी आमची अपेक्षा असल्याचेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.
लोकसभेसोबत वाजणार जम्मू-कश्मीर निवडणुकांचे बिगुल? सुप्रीम कोर्टाचे दोन मोठे निर्देश
काय म्हणाले मोदी?
सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निकाल दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कलम 370 रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटले आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बहिणी आणि बांधवांसाठी आशा, प्रगती आणि एकतेचा हा एक अद्भुत निर्णय आहे. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता अटल असून, आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नसून तो आशेचा किरण असल्याचेही मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोदींनी आता काश्मीर पंडितांची गॅरेंटी घ्यावी; ठाकरेंचा मार्मिक टोला#UddhavThackeray @UddhavThackeray #AdityaThackeray @AdityaThackeray #ShivsenaUBT @ShivsenaUBTComm pic.twitter.com/VeAooc8ira
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 11, 2023