आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का ?; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

  • Written By: Published:
आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का ?; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आरएसएस कार्यालयात गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. मुंबई महानगरपालिकेतील कार्यालयात मिंधे गट गेला होता. आता आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत विदर्भाला विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, ज्यांच्यामध्ये कर्तव्य नसते. काही करायचे नसल्यास ताबा घेतला जातो. दुसऱ्यांचे नेते चोराचे, दुसऱ्यांचे पक्ष चोरायचे. जागा बळकावयचे काम ते करतात. आरएसएसने कार्यालयातील कोपरे तपासून घेतले पाहिजे. कुठे लिंब टाकलेत का ते पाहावे, कब्जा करण्यांची नजर वाईट आहे. आरएसएसने काळजी घेतली पाहिजे. आरएसएस मजबूत आहेत. त्यामुळे ते ताबा घेऊ शकले नाहीत. आरएससने या पुढे काळजी घेतली पाहिजे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावलाय.

सरकारच्या कारभारावर टीका करताना ठाकरे म्हणाले, सहा महिन्यांत सरकारने काय केले ते सांगावे. विदर्भाला काय दिले ते सांगावे. हे उत्तर नाही असेच आहे. राज्यातील उद्योग बाहेर गेले आहेत. सरकाराने विदर्भासाठी खास योजना आणली पाहिजे. दीड दिवस राहिले आहेत. त्यात विदर्भासाठी योजना आणून, त्याची कशी अंमलबजावणी करता येईल हे पाहिले पाहिजे.

रोप झालेल्यांना क्लीन चिट का ?
संपूर्ण महाराष्ट्राला काय देणार आहे ते सांगावे. ५२ हजार कोटी रुपये कसे वापरणार आहे. काय करणार आहे. या पुरवण्या मागण्या आहेत. पूर्तता कशी करणार आहे ते सरकारने सांगावे. अब्दुल सत्तार, उदय सामंताच्या घोटाळ्याबाबत सरकार काय करणार आहे. आरोप झालेल्यांना क्लीन चिट दिली जात आहे. तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सरकारची योजना आहे काय असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube