समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात! भरधाव कार उलटून एकाचा मृत्यू

समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात! भरधाव कार उलटून एकाचा मृत्यू

Samruddhi Highway Accident : राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना (Samruddhi Highway Accident) काही केल्या थांबत नाहीत. आताही या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. जंगली प्राणी आडवा आल्याने चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 196 जवळ हा अपघात झाला. या अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.  कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!

याबाबत अधिक माहिती अशी, गौरी गणपतीच्या सणानिमित्त दुरतकर कुटुंबीय कारने पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समद्धी महामार्गावरून जात असताना वन्यप्राणी कठडे पार करून अचानक कारच्या समोर आले. या अनपेक्षित घटनेने सगळेच गोंधळून गेले. प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असतानाच भरधाव वेगातील कार तीन वेळा पलटी झाली. कारमधील प्रवासी जखमी झाले.  त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मात्र महिलेचा मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. वन्यप्राणी आडवे येत असल्यानेही अनेकदा अपघात झाले आहेत. या रस्त्यावर वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे प्राणी अचानक आडवे आल्याने चालकही गोंधळून जातात. या प्राण्यांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बऱ्याचदा अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

Earthquake in Italy : इटली हादरली; 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube