Video : पांडे, वाघ अन् दिनकरांचं भाजपात जंगी वेलकम; विरोध करणाऱ्या फरांदेंचे डोळे पाणावले

मी विरोध करण्यापेक्षा ते माझे मत होते, बबलू शेलार यांचा प्रेवश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमचं पॅनल तयार होतं.

  • Written By: Published:
Video : पांडे, वाघ अन् दिनकरांचं भाजपात जंगी वेलकम; विरोध करूनही डावलेल्या फरांदेंचे डोळे पाणावले

Devyani Pharande On Vinayak Pande & Yatin Wagh : आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने विरोधीपक्षातील एक दोन नव्हे तर, तब्बल 5 मातब्बर नेत्यांना पक्षात घेतले आहे. विशेष म्हणजे यातील माजी महापौर राहिलेल्या विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना पक्षात न घेण्यासाठी  भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी थेट विरोध केला होता. एवढेच काय तर, मंत्री गिरीश महाजन ज्यावेळी या नेत्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यक्रम स्थळी दाखल झाले त्याहीवेळी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. मात्र, फरांदे आमि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतरही भाजपने पांडे, वाघ अन् दिनकर यांचे जंगी वेलकम केले आहे. या पक्ष प्रवेशावर बोलताना देवयानी फरांदे यांचे डोळे मात्र पाणावलेले पाहण्यास मिळाले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

ब्रेकिंग : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्या पांडेंची पक्षातून हकालपट्टी; वाघ यांनाही बाहेरचा रस्ता

 मला कोंडीत पकडायचे असेल तर पकडा मी घाबरत नाही 

आज झालेल्या पक्ष प्रवेशाबद्दल बोलताना फरांदे म्हणाल्या की, मी विरोध करण्यापेक्षा माझं मत होतं. अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झाला होता तसेच पक्षाचे 3 असे पॅनल केले असतं तर निवडून आले असते. माझा कुणाला विरोध नाही मी नाराज नाही असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. मागील 40 वर्षांत मी स्वतःसाठी आजवर कधीही जाहीर भूमिका घेतली नाही, मी पक्षाची निष्ठावान आहे. सर्वानीच नेते व्हायचे आहे, मग कार्यकर्ते कोण राहणार हे मला वाटतं, असेही देवयानी फरांदे म्हणाल्या. मला कोंडीत पकडायचे असेल तर पकडा मी घाबरत नाही असा इशाराही त्यांनी कुणाचे नाव न घेता दिला.

राम शिंदेंसाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदाच बदलला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

डोळ्यासमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर…

फेसबुकवर मताची पोस्ट केली. गहिवरून येण्याचे कारण म्हणजे मी सामान्य कार्यकर्ते आहे. डोळ्यासमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर योग्य नसल्याचे सांगत पक्षात आलेल्यांची मी स्वागत करते पण, आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही.  निवडणूक प्रक्रियेत मी सक्रिय राहील असे सांगतना नेत्यांचा बळी दिला जात असेल त्यापेक्षा कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर, चुकीचा संदेश जाईल असेही फरांदेंनी सांगितले. गिरीष महाजन यांच्यावर नाराज नसल्याचेही यावेळी फरांदे यांनी सांगितले.

follow us