महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नका, अन्यथा तुमच्या मिशा कापू…; विद्या लोलगेंचा भिडेंना इशारा

भिडेंनी गुरूजींनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील, असा इशारा लोलगे यांनी दिला.

Vidya Lolge On Sambhaji Bhinde

Vidya Lolge on Sambhaji Bhinde : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ ​​मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी काल पुण्यामध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. वटपौर्णिमेबाबत बोलताना त्यांनी ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपूजनाला जाऊ नये, असं विधान केलं. त्यांच्या या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील वर्ल्ड ऑफ वुमेन्सच्या संस्थापक अध्यक्षा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे (Vidya Lolge) यांनी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

Government Schemes : दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना आहे तरी काय? 

भिडेंनी गुरूजींनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील, असा इशारा लोलगे यांनी दिला.

पुण्यात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या रक्षणसााठी वाटेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. ह्या व्रताची काही पथ्य आहे. त्यामुळंच वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलानी जाऊ नये, तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीचं जावं, असं भिडे म्हणाले. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोक आपल्याला तयार करायची आहेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडगं स्वातंत्र्य आहे आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असंही ते म्हणाले.

Ashvini Mahangade : सौंदर्य क्वीन, अश्विनीच्या नऊवारी साडीतील लुकने वेधले लक्ष 

दरम्यान, विद्या लोलगे यांनी भिडेंच्या वक्तव्याबाबत बोलताना सडेतोड उत्तर दिलं आहे. भिडे गुरूजींनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून मिशा कापतील, असा इशारा देत भविष्यात विधवा आणि घटस्फोटित महिलांना ‘स्वयंसिद्धा’ या नावाने ओळखण्यात यावे, शासनाने तसे परिपत्रक काढावे, अशी मागणी लोलगे यांनी केली आहे.

संस्थेची माहिती देताना त्या म्हणाल्या की, घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यावर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. विशेषत: त्यांच्या पत्नी आणि लहान मुलांवर. अशा महिलांना आधार देऊन त्यांना संघटित करून त्यांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आल्याची माहितीही लोलगे यांनी दिला.

 

follow us

संबंधित बातम्या