पार्थ पवारांवर टांगती तलवार कायम, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट
Parth Pawar : दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.
Parth Pawar : दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पार्थ पवार लवकरच राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढू शकतात असं सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, या प्रकरणात त्यांना आतापर्यंत क्लीन चीट मिळालेला नाही. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विकास खरगे समितीने (Vikas Kharge Committee) अद्याप आपला अंतिम अहवाल तयार केलेला नाही. राज्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या तपासाचा अहवााल लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात (Mundhwa Land Deal Case) पार्थ पवार यांच्या अडचणी वाढू शकतात.
तर दुसरीकडे या प्रकरणात अंतिम अहवाल सादर करण्यासाठी खरगे समितीला यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता हा अहवाल 6 फेब्रुवारीला सादर होणार असल्याची चर्चा होती मात्र यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची बैठक न झाल्याने तसेच काही तांत्रिक बाबींची पूर्तात बाकी असल्याने हा अहवाल सादर होण्यास आणखी विलंब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात जेव्हापर्यंत पार्थ पवार (Parth Pawar) यांना क्लीन चीट मिळत नाही तेव्हापर्यंत पार्थ पवार यांच्यावरील टांगती तलवार कायम राहणार असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
पार्थ पवार यांच्या संबंधित अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा परिसरात असणारी 800 कोटींची 40 एकर जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली असल्याचा आरोप आहे. या व्यवहारात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा देखील आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
T20 World Cup 2026 पाकिस्तानच्या अडचणी वाढणार, आणखी एक सामना होणार रद्द
तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शीतल तेजवानी याच्यासह तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारु यांना अटक केली आहे.
