Weather Update : पावसाचा जोर ओसरला! आज ‘या’ भागात हलक्या सरी कोसळणार

Weather Update : पावसाचा जोर ओसरला! आज ‘या’ भागात हलक्या सरी कोसळणार

Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 13 डिसेंबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. आज कोकण, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांत मात्र हवामान साफ राहिल असा अंदाज आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत केरश, लक्षद्वीप आणि तामिळनाडूत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर काही ठिकाणी जोरदार पावसाचाही अंदाज आहे. ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेटे, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात हलका पाऊस होईल. उत्तर भारतातील बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतात दाट धुके पडेल.

Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ अन् अवकाळी! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम आता कमी झाला आहे. राज्यात ढगाळ हवामान गायब झाले आहे.  पावसाचा जोरही कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही.  या चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान स्वच्छ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील काही राज्यांत अवकाळी पाऊस होईल. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, लक्षद्वीप या राज्यात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल.

Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube