Weather Update : आज ‘या’ 6 जिल्ह्यांत मुसळधार; यलो अलर्ट जारी

Weather Update : आज ‘या’ 6 जिल्ह्यांत मुसळधार; यलो अलर्ट जारी

Weather Update : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Weather Update) झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आता राज्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत आज हलक्या स्वरुपाचा पाऊस (Rain) होईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात (Weather Update) झाली आहे. त्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लिवत झाल्या आहेत. ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी या महिन्यातील कसर सप्टेंबर महिन्यात भरून निघेल अशी शक्यता दिसत आहे. सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले

नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही कोसळधार पाऊस (Weather Update) झाला. त्यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसाच्या बॅटिंगमुळे गंगापूर धरणांमध्ये दोन दिवसांपासून पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे सुरुवातीला पाचशे क्सुसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे.

Maharashtra Politics : CM शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार? मोठी अपडेट मिळाली

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube