शिक्षकांच्या भावी आमदाराचं भवितव्य मतपेटीत, नाशिक शिक्षक मतदारसंघात 93.48 टक्के मतदान

शिक्षकांच्या भावी आमदाराचं भवितव्य मतपेटीत, नाशिक शिक्षक मतदारसंघात 93.48 टक्के मतदान

Nashik Teachers Constituency :  राज्यात आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापैकी नाशिक शिक्षक मतदारसंघामध्य (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले. नाशि मतदारसंघातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात 96.12 टक्के, नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के तर नगर जिल्ह्यामध्ये 93.88 टक्के मतदान झाले.

मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खडसेंवर पलटवार 

नाशिक विभागातील एकूण 90 केंद्रावर मतदान प्रक्रिया ही पार पडली. या मतदानासाठी सकाळपासूनच शहरातील अनेक केंद्रांवरती मतदारांनी गर्दी केली होती. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण पाच जिल्हे असून यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह अहमदनगरचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे नगर जिल्ह्यात झाले आहे. तर सर्वाधिक कमी मतदान हे नाशिक जिल्ह्यात झाले आहे.

सर्वाधिक पेपरफुटी ठाकरेंच्या काळात; बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा…; फडणवीसांनी सगळचं काढलं 

नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमधील एकूण 90 मतदान केंद्रावर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे सर्वत्र मतदानाची टक्केवारी 90% टक्क्यांपेक्षा अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 96.12%, धुळे जिल्ह्यात 93.77%, जळगाव जिल्ह्यात 95.26%, नाशिक जिल्ह्यात 91.63% आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 93.88% मतदान झाले आहे. पाचही जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 93.48% आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण 69,368 मतदार होते. त्यापैकी तब्बल 64,846 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नाशिक शिक्षण मतदारसंघात झालेली मतदानाची टक्केवारी 93.48% आहे.

नाशिक मतदारसंघात चौरंगी लढत
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत एकूण 21 उमेदवार असून यामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष विवेक कोल्हे अशी चौरंगी लढत झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज