शरद पवार की अजित पवार? प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केली भूमिका

शरद पवार की अजित पवार? प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केली भूमिका

Prajkta Tanpure with sharad pawar : राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे पाऊल उचललं. राष्ट्रवादीतील (NCP) काही आमदारांना सोबत घेत त्यांनी आज शरद पवारांची साथ सोडली आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर नगर जिल्ह्यतील तीन आमदार गेले आहेत. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत असून आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं तनपुरेंनी सांगितलं. (After the rebellion in the NCP MLA Prajakta Tanpure said I am with Sharad Pawar)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राजकारणात दिसून आला. अखेर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत आपल्या ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. एवढंच नाही तर अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या आमदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदारही दिसले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संग्राम जगताप, किरण लहमटे आणि निलेश लंके यांचा समावेश आहे. दरम्यान, सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचे अजित पवार सांगत असले तरी प्राजक्त तनपुरे यांनी यांनी सुचक ट्विट केलं. त्यांनी शरद पवारांसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला तनपुरेंनी मी साहेबांसोबतच असं कॅप्शनही दिले आहे. आ.तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर होती, पण जयंत पाटलांनी सांगितले… 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर वर्षभरानंतर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत. तसेच आगामी निवडणुक शिवसेना-भाजपसोबत एकत्र लढू. आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू असं सांगत थेट पक्षावरच त्यांनी दावा केला. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी आपली स्पष्ट केली भूमिका. तनपुरेंनी आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचे ट्विट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube