नगर जिल्ह्यात होणार भव्य महसूल भवन; मंत्री विखेंच्या हस्ते भूमिपूजन

  • Written By: Published:
नगर जिल्ह्यात होणार भव्य महसूल भवन; मंत्री विखेंच्या हस्ते भूमिपूजन

अहमदनगर :  महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून यात घरी बसून काम करणारे कोणीही नाही त्यामुळे जनतेच्या प्रश्नाची जान असलेले हे सरकार आहे. ते जनतेत जावून काम करते, असं विधान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजुला 47 कोटी 86 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसुल भवन, या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे होते. तर व्यासपीठावर महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींचा महसुल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. त्यामुळं नागरिकांना अत्यंत कमीवेळेत सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी महसुल भवनाच्या माध्यमातून सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येत आहेत. यामुळं प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल. या नवीन महसुल भवनातून नागरिकांची कामे अधिक गतीने होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सामान्य व्यक्तीस कार्यालयात न येता अत्यंत कमी वेळात व सुलभतेने मिळाव्यात यासाठी महसुल विभागाच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वन अम्ब्रेला ॲडमिनिस्ट्रेशनवर भर आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अशाच प्रकारच्या महसुल भवनाच्या उभारणीसाठी नियोजन करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पूर्वी जमीनीची मोजणी पारंपरिक पद्धतीने केली जात होती. जमीन मोजणीसाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. परंतू आधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करत रोव्हर मशिनने जमीनीची मोजणी अत्यंत कमी वेळेत करण्यात येत असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

World Cup 2023 : पाकिस्तानला धूळ चारली अन् भारताची गुणतालिकेत मोठी झेप ! 

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगत आपला जिल्हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यासह राज्यातील पशुधन वाचवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे, अशा शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी मोफच बियाने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली, याची माहितीही विखेंनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube