गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधानसभेत! आमदार संग्राम जगतापांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचला…
Ahmednagar News : अहमदनगरमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आता थेट विधानसभेत गाजला आहे. अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनावरच कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तीन हत्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षकांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.
PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी
आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच धर्मगुरु राजाभाऊ कोठारींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही आरोपींना जामीन मिळाला होता. तेच आरोपी एका धार्मिक कार्यक्रमाच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते, त्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. वेळीच आरोपींवर कडक शासन झाले असते, तर तणाव निर्माण झाला नसता, असंही संग्राम जगताप म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचे पुणे दौरे वाढले; उद्धव ठाकरेंनी सांगितला अर्थ…
तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातही व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला घडला होता. शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हत्या घडण्याचं सत्र सुरुच आहे. या हत्यांप्रकरणी फक्त आरोपी अटक करुन चालणार नाहीतर योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन खूनाच्या घटना घडतात, त्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाची चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम्ही जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवदेनाद्वारे कारवाईची मागणी केली मात्र, कारवाईसंदर्भात ठोस पाऊलं उचलण्यात आलेली नसल्याचं आमदार जगतापांनी म्हटलं आहे. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी. शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष देऊन उचित पाऊल उचलावे, असंही ते म्हणाले आहेत.