अजितदादांनी सांगितले, ‘पोलीसांच्या हाफ पॅटची फूल पॅट कशी झाली’

अजितदादांनी सांगितले, ‘पोलीसांच्या हाफ पॅटची फूल पॅट कशी झाली’

Ajit Pawar on Baramati: शरद पवारसाहेब (Sharad Pawar) पोलीस विभागाचे अनेकवेळा प्रमुख होते. पूर्वी पोलीसदलात महिला नव्हत्या. त्यावेळी पुरुष पोलीसांना हाफ पॅट असायची नंतर पवारसाहेबांनी फूल पॅट दिली. त्यावर एक जाड पट्टा असायचा. आता त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वी पोलीसांच्या ड्युट्यांची मोठी समस्या होती. त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी पोलीसांची आरोग्य तपासणी केल्या आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. पुढं देखील घेतली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात सांगितले.

आम्ही लहान असताना बारामतीमध्ये सावंत नावाचे फौजदार होते ते मोटारसायकलवरुन निघाले की गुंड तर चळाचळा कापायचे. त्यांच्यावर चित्रपट देखील निघाला होता. चांगलं काम केलं की चित्रपट देखील निघतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखायची तुमची जबाबदारी आहे. आपल्यातले काही पोलीस तर इतके हुशार आहेत की त्यांना मोकळीक दिली, आमचा राजकीय हस्ताक्षेप नसला पाहिजे. त्यांना सांगितले कोणतीही गरबड होता कामा नये तर सगळ्यांना सरळ करतील, अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीला धूळ चारत भाजपने केला पुणे बाजार समितीमध्ये शिरकाव

पोलीसांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कायद्याने वागलं पाहिजे. न्यायाशी कोणत्याही परिस्थित तडजोड करता काम नये. आपल्या कारकिर्दीत कोणावरही अन्याय होणार नाही असं वागलं पाहिजे. आपली ज्या पदावर निवड झाली आहे त्या पदावर कधीही समाधानी राहायचे नाही. वरच्या पदावर जाण्याची महत्वकांक्षा आपल्या मुलं-मुलांकडून ठेवली पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी पोलीसांना केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube