आधी साखर कारखाना, खरेदी विक्री संघ अन् आता पिचडांकडून NCP ने बाजार समितीही हिसकावली
Akole Agricultural Market Committee elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तर त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचा (alole Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला असून या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Gulabrao Patil) यांचा बाजार समिती निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्हयाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या. तर पिचड गटाला अवघ्या सात जागा मिळाल्या आहेत.
अकोले बाजार समिती बराच पिचडांच्या ताब्यात होती. त्यामुळं यंदा या निवडणुकीत पिचड गटाला पराभूत करण्यासाठी किरण लहामटे यांनी चांगलीच ताकत लावली होती.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे आणि सिताराम गायकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृध्द मंडळला 11 जागा मिळाल्या. तर भाजपच्या पिचड गटाला अवघ्या सात जागा मिळाल्या आहेत. तर भाजप 3 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळं पिचड गटाच्या पदरी निराशी पडली असून आता ही बाजार समिती राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे-सिताराम गायकर यांच्या ताब्यात गेली आहे.
जामखेड बाजार समिती राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी
मधुकर पिचड हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे. पण 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या पिचड पिता-पुत्राला एकापाठोपाठ एक धक्का बसत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड यांच्या पदरी निराशा आली होती. त्यानंतर 28 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. आणि आता बाजार समितीही राष्ट्रवादीने पिचड यांच्याकडून हिसकावली.
हमाल व मापाडी मतदार संघात
वैद्य मारूती परसुराम
सर्वसाधारण शेतकरी प्रतिनिधी –
आरज शिवनाथ विठ्ठल
आरोटे योगेश गजानन
कचरे रुपाजी धोंडीबा
खांडगे भास्कर बाळाजी
भोर रोहिदास जिजाबा
रंधे सचिन होशीराम
वाकचौरे ईश्वर सोमनाथ
महिला राखीव
कोरडे स्वाती तुकाराम – 510
भांगरे मंगल अनिल – 503
सहकारी संस्था इतर मागास वर्ग शेतकरी प्रतिनिधी
सावंत बाळासाहेब गणपत