राष्ट्रपती राजवट लागू करा, रोहित पवारांनी केली मागणी…

राष्ट्रपती राजवट लागू करा, रोहित पवारांनी केली मागणी…

राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता व्यवस्था ढासळून गेली आहे , त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवर सत्ताधारी सरकारवर सरकारने गंभीर आरोप केले आहेत.

‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर

आमदार पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी येत असेल तर राज्यातल्या सर्वसामान्य माणसांचं काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी धमकीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच राज्यातलं हे सरकार झोपलं असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा टोला

राज्य सरकारचा मागील एक वर्षांचा इतिहास पाहिला तर राज्याची सुरक्षा, राजकीय घडामोडी, फडतूसगिरी चालली आहे. राज्यातले सर्वसामान्य लोकं सुरक्षित नाहीत. राज्यात दंगली घडत असून सामाजिक तेढ निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीने कायम ओबीसींचा घात केला; बावनकुळेंचा घणाघात

ज्या ठिकाणी दंगलीच्या घटना घडत आहेत, अशा ठिकाणी प्रशासन उशिरा पोहचतं, त्या ठिकाणी योग्य ती पाऊले उचचली जात नसल्याचा आरोप करत रोहित पवारांनी राज्यव्यवस्थेवर बोट ठेवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना यांना ट्विटरवरून आलेल्या जीवे मारण्याची धमकीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. या धमकी प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. तसेच विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे.

लव्ह जिहाद अन् औरंगजेबाचे उदात्तीकरण; हिंदू धर्मीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची परवानगी द्या!

तर कोल्हापूर अहमदनगरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्यात येत असल्याचं प्रकार घडत आहेत. अहमदनगरला औरंगजेबाचे पोस्टर झळकले तर कोल्हापुरात औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट सोशल मीडियावर झळकल्याचं समोर आलं. त्यावरुन अहमदनगरमध्ये मोर्चात दोन गटांत वाद तर कोल्हापुरात हिंदुत्ववादी मोर्चात हिंसाचार घडल्याचं दिसून आलं.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडींवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पवार यांनी थेट महाराष्ट्रात आता व्यवस्था ढासळून गेली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube