Solapur News : विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांचा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

Solapur News : विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांचा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार (Boycott of examination proceedings by non-teaching staff of universities and colleges)टाकलाय. त्यामुळं राज्यामधील विद्यापीठांच्या परीक्षा (Exam) पद्धतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. आजपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University)होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केलंय. त्यामुळं पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर (Dr. Shivkumar Ganpur)यांनी सांगितलंय.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बीए (BA), BSC (बीएससी), BBA(बीबीए), विधी पदवी(LAW)काही विभागाच्या सुरु आहेत किंवा काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरु केल्यानं परीक्षावर परिणाम झालाय.

2016 पासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करताहेत. शासनाकडून फक्त आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतो. राज्यातील 288 पैकी जवळपास 200 आमदारांना यासंदर्भात पत्र दिलेत.

उच्च शिक्षण मंत्र्यांकडं देखील निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र या मागण्यांची दखल न घेतल्यानं आजपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. 20 फेब्रुवारीपासून परीक्षेसह सर्वच पद्धतीच्या कामकाज बंद करण्याचा इशारा महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला.

23 जानेवारीपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाली. तर काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशातच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानं परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की ओढावल्याचं पाहायला मिळतंय.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनाचा परिणाम झालाय. विविध मागण्यांसाठी आजपासून कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन करण्यात आलंय. परीक्षेची पुढील तारीख आणि माहिती संकेस्थळावरुन कळवणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube