शौर्य दिन! विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

शौर्य दिन! विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

पुणे : भीमा कोरेगावची लढाई ही पुणे जिल्ह्यामधील भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी झाली होती. दरम्यान या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.

या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

दरम्यान हा विजय स्तंभ गेल्या २०० वर्षांहून अधिक काळ दिमाखात उभा आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे. महिला पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. विजय स्तंभाच्या सर्वात वरच्या भागात तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

हा संपूर्ण परिसर विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. दरवर्षी १ जानेवारीला या ठिकाणी मानवंदना दिली जाते. या विजयस्तंभाचा इतिहास २०० वर्षांहून अधिक जुना आहे. या ठिकाणी दरवर्षीच विजय उत्सव हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube