Kolhapur जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करा; न्यायालयाचा आदेश
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपट़ॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?
जप्तीचे कारण काय ?
जप्तीची प्रक्रिया चालू असली तरी याच कारण काय हे समजून घ्याव लागेल. कुरुंदवाड मधील एका जमिनीच्या वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्यानं न्यायालयाने हे आदेश देण्यात आले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत.
याबाबत मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड मधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा वाद सुरू होता. यामध्ये कुरुंदवाड मधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन घेतली होती. जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने १९८४ पासून खटला चालू होता. यावर निकाल देताना न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?