‘शाहू छत्रपती खासदार झाले तर आनंदच’; शरद पवारांनी भेटीचं गुपित सांगितलं

‘शाहू छत्रपती खासदार झाले तर आनंदच’; शरद पवारांनी भेटीचं गुपित सांगितलं

Sharad Pawar & Shahu Chatrapati Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांकडून पडगम सुर झालं आहे. सर्वच पक्षाकडून राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरचे शाहु छत्रपती (Shahu Chatrapati) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शाहु छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शाहु छत्रपतींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून गुपित सांगितलं आहे.

‘उद्धव ठाकरेंचाही आमच्यावरच विश्वास’; विधेयक मंजुरीनंतर फडणवीसांची बोचरी टीका

शरद पवार म्हणाले, मी इतकी वर्षे शाहू छत्रपतींना भेटतोय, परंतु ते मला कधी निवडणूक लढवण्याबद्दल बोलले नाहीत. तसेच तुम्ही सर्व माध्यमं जी चर्चा करत आहात त्यावर मी बोलू शकत नाही. कारण महाविकास आघाडीत मी एकटा नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे असे निर्णय आम्ही तिन्ही पक्षांमधील सर्व प्रमुख नेते मिळून घेतो.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शरद पवार गट आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागांच्या संदर्भातला निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ. महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांशी बोलूनच आम्ही महत्त्वाच्या गोष्टी ठरवतो. मी या विषयावर माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशीदेखील चर्चा केली नाही. परंतु, तुम्ही व्यक्तीगत मला विचारलंत तर मला आनंदच होईल. शाहू छत्रपती कोल्हापूरचे खासदार झाले तर मला आनंदच होईल. परंतु, शाहू महाराजांचा प्रत्यक्ष राजकारणात फारसा सहभाग नसतो. सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो

मागील काही दिवसांपासून शाहु छत्रपती यांनीही खासदारकी लढवण्याबाबत इच्छा दर्शवली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज पक्षाच्या माध्यमातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

Chandigarh Mayor Election : मतपत्रिकेवर खाडाखोड केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली ; सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे

तेव्हा भाजप दोन आणि महाविकास आघाडीच्या चार जागा निवडून येतील असं संख्याबळ होते. महाविकास आघाडीतीन तीन पक्ष तीन जागा लढवणार होते. तर चौथ्या जागेवर शिवसेनेने दावा केला. याच जागेवरुन आपल्याला राज्यसभेत पाठवावं, अशी भूमिका संभाजीराजेंची होती मात्र, त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आली.

त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेच्या ऑफरला कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना मैदानात उतरवलं होतं. घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाही, माझे निष्कलंक व्यक्तिमत्व असून निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं स्पष्टीकरण देत संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटनेची स्थापना केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube