‘उद्धव ठाकरेंचाही आमच्यावरच विश्वास’; विधेयक मंजुरीनंतर फडणवीसांची बोचरी टीका
Devendra Fadnvis On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचाही आमच्यावरच विश्वास असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. विधेयकाच्या मंजुरीनंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बहुचर्चित Operation Valentine चा ट्रेलर लॉन्च! मानुषीचा पहिला तेलगू चित्रपट असणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयकाच्या मंजुरीनंतर कायदा मंजूर होणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या सरकारी नोकरीच्या जाहीरातींमध्ये मराठ्यांसाठी वेगळ्या जागा निघणार असून त्याचा मराठा तरुणांना फायदा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा
मराठा आरक्षण विधेयकावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. सरकारने तरुणांना जमिनीवरच नोकऱ्या दिल्या पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचाही आमच्यावर विश्वास आहे. ही चांगली गोष्ट आहे, त्यांचा विश्वास योग्य हे आम्ही दाखवणारच आहोत. मराठा समाजाला आरक्षण कोण देऊ शकेल तर एकनाथ शिंदे यांचंच सरकार देणार हे उद्धव ठाकरेंना माहित असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.
चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’चा रौप्य महोत्सव
SC च्या त्रुटी अन् सर्वेक्षण करुनच 10 टक्के आरक्षण…
मी मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही त्रुटी काढल्या आणि रद्द आरक्षण केलं होतं. त्यावर चीफ जस्टीस भोसलेंची समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून त्रुटींवर अभ्यास करुन दूर केल्या. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक लोकांच्या घरोघरी जात सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर आयोगाने अहवाल दिला अन् अहवालानंतरच आज अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यात आलं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.