‘जरांगेंना मुंबईत यायची गरजच पडणार नाही, त्याआधीच आम्ही…’; मंत्री मुश्रीफांचा मोठा दावा

  • Written By: Published:
‘जरांगेंना मुंबईत यायची गरजच पडणार नाही, त्याआधीच आम्ही…’; मंत्री मुश्रीफांचा मोठा दावा

Hasan Mushrif on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत संपून गेली, मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघणार पदयात्रा सहा जिल्यातून जाणार असून यामध्ये तीन कोटी मराठा समाज होईल, असा दावा करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठा दावा केला आहे.

Year Ender 2023 : 2048 धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू… कोहलीसाठी हे वर्ष ठरले ‘विराट’ 

मनोज जरांगे आक्रमक
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले. त्यांचा मोर्चा 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघणार आहे. मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवनागी दिली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, जागा मिळेल तिथं आदोलन करू, अडवण्याचा प्रयत्न झाला तर गहमंत्र्याच्या घरात जाऊन बसू, असा इशारा त्यांनी दिला.

बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का, कुस्ती महासंघाच्या कार्यालयाचा पत्ता बदलला 

दरम्य्न, आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मुंबईत मराठा समाजाकडून होत असलेल्या आंदोलनाविषयी विचारले असतात ते म्हणाले की, मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरजच पडणार नाही. त्यापूर्वीच आम्ही आरक्षण देणार आहोत, असा दावा मुश्रीफ यांनी केला.

पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना कामासाठी गाडी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.त्यासाठी 40 हून अधिक कारही खरेदी करण्यात आल्या आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामान्य माणसाला एक गाडी घेतानाही ऩाकीनऊ येतं, असं म्हणत अजित पवार गटाकडे इतका पैसा कुठून आला, असा सवाल केला. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता असते ते म्हणाले की, आमचे नेते सुनील तटकरेच या सगळ्याचा हिशोब देतील, असे सांगितले.

‘भारत न्याय यात्रा’चा परिणाम होणार नाही

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत न्याय यात्रा’चे आयोजन केले. या यात्रेला मणिपूरपासून सुरूवात होणार असून ती महाराष्ट्रात संपेल. ही यात्रा संपताच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, याआधी त्यांनी भारत जोडो यात्र4 काढली होती. त्यानंतर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची केवळ एकाच राज्यात सत्ता आली. त्यामुळं काँग्रेसच्या या यात्रेचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube