दुष्काळी पारनेरमध्ये ढगफुटी, ओढे-नाले दुथडी भरून वाहिले

दुष्काळी पारनेरमध्ये ढगफुटी, ओढे-नाले दुथडी भरून वाहिले

अहमदनगर – गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून (Monsoon) अखेर अहमदनगर जिल्ह्यात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. यातच जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही गावांना पावसाने जोरदार झोडपले आहे. पारनेरमधील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस (Cloudburst-like rain) झाला. या पावसामुळे ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले. दरम्यान, काल झालेल्या या जोरदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. (In Parnera, it rained like a cloudburst, streams and rivers started flowing in torrents)

बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेल्या पावसानं काल राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. मान्सूनची प्रतिक्षा करणाऱ्या राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या काही दिवसाांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस हुलकावणी देत असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे देखील आभाळाकडे लागून होते. अशातच काल (शनिवारी) अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, वडझिरे या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार झालेल्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे. या पहिल्याच मुसळधार पावसामुळे दोन्ही गावाच्या परिसरातील ओढून नाले भरून वाहू लागले आहेत.

लाचखोर रामोडची बदली रोखण्यासाठी विखेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अंबादास दानवेंनी पुरावाच दाखविला ! 

पारनेर तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला. मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं खरिपाच्या पेरणीला उशीर झाला. असं असताना जोरदार पाऊस झाल्याने या भागातील शेतातील पेरण्या लवकरच सुरू होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube