नाशिक मनपावर भगवा फडकवून दाखवू- आ. सुहास कांदे

नाशिक मनपावर भगवा फडकवून दाखवू- आ. सुहास कांदे

नाशिक : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. लवकरच राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंदे गटही सक्रीय झाला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेवर आपण मुख्यमंत्री शिंदे यांना भगवा फडवकून दाखवू, त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या वार्डात शाखा उद्घाटन केले पाहिजे. मागील गेल्या अडीच वर्षात जे कामे झाले नाहीत, ते मागच्या काही महिन्यातच झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काम करत आहेत ते दिसायला जरा वेळ लागेल. पण मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत. आपणही त्यांना साथ देऊ आणि मनपावर भगवा फडकवू, असं प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केलं.

शिंदेंनी केलेल्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असतात. हे दोन्ही गट कायम एकमेकांवर कुरघोडी करत असतात. नाशिकमध्येही याचे पडसाद नेहमीच पाहायला मिळत असतात. अशातच आता नाशिकमध्ये 2 शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शहरात दिसणार आहेत. ठाकरे गटाचे मध्यवर्ती कार्यालय हे आधीच शहरात आहेत. तर आज शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना आमदार सुहास कांदे यांनी आपण देखील नाशिक मनपावर भगवा भगवा फडवकून दाखवू, असं सांगितलं.

शिरसाट खोके देत नाहीत म्हणून ते मंत्री होत नाहीत; चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य 

ते म्हणाले की, आगामी काळात महापालिका निवडणूका होणार आहेत. त्यासाठी आता आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आपल्या वार्डात शाखांचे उद्घाटन केले पाहिजे. फक्त कार्यालयाचे लोकार्पण झाले आणि आपण घरी गेलो असे करून नका, असं कांदे म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार असतांना जे काम झाले नाहीत ती कामे मागच्या काही महिन्यात झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसा आणि रात्री देखील कामाचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे जे काम करत आहेत ते दिसायला जरा वेळ लागेल. पण मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत. आपणही त्यांना साथ देऊ. आणि नाशिक मनपावर भगवा फडकवून दाखवू. युती कोणाबरोबर होईल कुणाला किती जागा मिळतील, मला उमेदवारी मिळाली, तरच मी काम करेन, अस करू नका, असंही कांदे म्हणाले.

दरम्यान, कांदे म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे जसे ठाणे, कल्याण, डोंबिवलीकडे कशा प्रकारे लक्ष देता, तसे नाशिककडे देखील वैयक्तिक लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिले तर जिल्ह्यातील सर्व आमदार आपले निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube