राजू शेट्टींची मोठी घोषणा ! कार्यकर्त्यांना म्हणाले, तयारीला लागा लोकसभा निवडणूक..

राजू शेट्टींची मोठी घोषणा ! कार्यकर्त्यांना म्हणाले, तयारीला लागा लोकसभा निवडणूक..

Raju Shetty : आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढताना पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. एक प्रकारे त्यांनी या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिरास आजपासीन सुरुवात झाली. या शिबिरात संघटनेची राजकीय वाटचाल, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निवडणुकांची तयारी या महत्वाच्या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. या शिबिराला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा : Raju Shetti : राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

शेट्टी पुढे म्हणाले, मागील निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या. त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला. आता मात्र आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढणार आणि निवडणूक जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील

सध्या शेतकरी, कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आता आपल्याला काम करायचे आहे. खोके संस्कृतीमुळे राज्याची बदनामी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मेळावे, बैठका, सभांचे सत्र सुरू झाले आहे. नेतेमंडळींकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवडणुकांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठीच आज या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करत त्यांनी एक प्रकारे कार्यकर्त्यात नवा उत्साह  संचारण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिरात निवडणुकांच्या दृष्टीने पुढील वाटचालीबाबतही चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube