Maharshtra Politics : भाजपच्या मोठ्या नेत्याच्या कन्येवर मोठी जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार फायदा

Maharshtra Politics : भाजपच्या मोठ्या नेत्याच्या कन्येवर मोठी जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार फायदा

Maharshtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांच्या आगामी पीढी देखईल राजकारणात सक्रीय झाली आहे. त्यामध्ये आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या कन्येवर देखील पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील. तर त्यांची मुलगी अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे.

Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट

अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी…

अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. त्यांची ही निवड आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. हर्षवर्धन पाटील यांनी देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याचसोबत त्यांच्या कन्या अंकीता पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार फायदा

अंकीता यांची राजकीय कारकिर्द भाजपमध्ये येण्याआधी कॉंग्रेसमध्येच सुरू झाली होती. त्यावेळी त्यांनी इंदापूर तालूक्यातील लाखेवाडी-बावडा गटातून कॉंग्रेसच्या तिकीटीवर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजयही मिळाला होता. त्यानंतर आता भाजपमध्ये देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागलं आहे. त्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांची नियुक्ती पक्षाला फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेल्या अंकीता पाटील यांची यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube