मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…; शिवरायांच्या पुतळ्यावरून आमदार तनपुरे आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…; शिवरायांच्या पुतळ्यावरून आमदार तनपुरे आक्रमक

अहमदनगर – मालवणधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, पण सत्तेला चिकटून बदलेल्या मुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांपेक्षा खुर्ची महत्वाची वाटते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली.

नरगिस फाखरीने कलरफुल्ल ड्रेसमधील फोटो केले शेअर, दिसली खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस, पाहा फोटो 

मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आला होता. अत्यंत दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसेच शिवप्रेमींचं आकर्षणाचं केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने सर्वांनाच धक्का बसला. 3600 कोटी रुपये खर्चून उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. आता राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे यांच्यासह शिवप्रेमींनी आज राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला आहे.

फडणवीसांची भेट कुणाल टिळकांची ‘कसब्यासाठी’ फिल्डिंग; रासने, बापटांचे टेन्शन वाढणार? 

तनपुरे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या ठिकाणी गड-किल्ले, पुतळे बसविले ते अजून दिमाखात उभे आहेत. १९६० ते १९७० च्या दशकात तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई येथे समुद्र किनारी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतके वर्ष झाले तरी तो अद्यापही मोठ्या दिमाखात उभा आहे. हा पुतळा ज्या ठिकाणी उभा आहे, तो सुद्धा समुद्र किनारी उभा असून वादळी वाऱ्याला सामोरे जातो. पण मालवण येथे आठ महिन्यांपूर्वी बसविलेला छत्रपतींचा पुतळा कोसळतो, हा शिवप्रेमीचा अपमान आहे.

तनपुरे पुढं म्हणाले की, हा पुतळा ज्यांनी बसविला त्यात मोठा भष्टाचार झाला असून त्याची तातडीने चौकशी करण्यात यावी. राज्यातील भष्टाचार हा थेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला आहे. आ.प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार सकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube