लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!

लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!

Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली.

राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली. तर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन याच मागणीसंदर्भात निवेदन दिले. याबाबत पवार यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

राज्य सरकार विसर्जित करण्याचा प्रश्नच येत नाही. 145 आमदार असल्यास सरकार स्थापन होऊ शकते. आम्हाला तर 200 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना अशा मागण्या करत होतो, पण फारसे काही साध्य होत नव्हते, असे अजित पवार यांनी म्हटले.

Mumbai Politics : झिशान सिद्दीकींची ठाकरे गटावर नाराजी; म्हणाले, ‘अनिल परबांनी घात…’

अलीकडच्या काळात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, अंतर्गत वादातून या घटना घडल्याचे दिसते. मतभेद सोडवले आहेत हे दाखवण्यासाठी फेसबुक लाईव्हचा वापर केला जातो. ते संपल्यानंतर गोळीबार केला जातो. यात पोलिसांचा काय दोष? गोळीबार करणारा आणि पीडित दोघेही पोलिस ठाण्यात रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते. या घटनेमागचे कारण तपासले जात आहे. कालची घटना म्हणजे उगाच साप साप म्हणून जमीन थोपटण्याचा प्रकार आहे. इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच नाही, तिथे गुंड गुंडांना मारत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
प्रिया दत्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा सिद्दिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या विधानाने खळबळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज