लव जिहाद, धर्मांतरण घडल्यास पोलिस अधिकारीच जबाबदार, विखेंचा इशारा
Radhakrishna Vikhe On Love Jihad : महसूलमंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज नगरमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीत पोलिस विभागाला सतर्क राहुन शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. पण राधाकृष्ण विखे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना एक इशाराही दिला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत लव जिहाद आणि धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यास थेट पोलिस ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांवर राजकीय दबाव; खासदार विखेंचे मोठे विधान
गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात धर्मांतर लव जिहाद प्रकरणे उघडकीस आले आहेत. श्रीरामपूरमध्ये लव जिहाद धर्मांतर प्रकरणे गाजले होते. आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण विधानसभेतही गाजवले होते. तर राहुरीतील धर्मांतर प्रकरण आमदार राम सातपुते यांनी उचलून धरले होते. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती.
PHOTO : आता सिकंदराबाद रेल्वे स्टेशन होणार आधुनिक, पाहा फोटो
आता थेट बाहेर जिल्ह्यातील पक्षांचे आमदार थेट जिल्ह्यात लक्ष देऊन आहेत. त्यामुळे विखे यांनी थेट पोलिसांनाच जबाबदार धरणार असल्याचं म्हटलं आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता बैठकीसाठी आले होते. त्यावेळी लव जिहादची प्रकरणे ज्या हद्दीत घडलेत त्या हद्दीच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा सज्जड इशारा दिला आहे.
Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर
सार्वजनिक सण उत्सव करायचे त्याने स्वत: च्या पैशांतून करावे. वर्गणी हवीच कशाला? असा सवालही बैठकीत विखे यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात धार्मिकतेची मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत जिल्ह्यात होणार सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी समाजात तेढ निर्माण करणाऱ्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, असेही निर्देश विखे यांनी दिल आहेत.