‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शिर्डीलाच का? मंत्री विखे स्पष्टच बोलले…

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शिर्डीलाच का? मंत्री विखे स्पष्टच बोलले…

अहमदनगर : शासनाचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित शासन आपल्या दारी (shasan aaplya dari) हा कार्यक्रम येत्या ११ ऑगस्ट रोजी शिर्डी (shirdi) येथे होणार आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, हा एवढा मोठा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी न होता, शिर्डीत होतोय, त्यामुळं नाराजी व्यक्त केली जात आहे. आता यावर खुद्द महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भाष्य केलं. (Radhakrishna Vikhe Patil on shasan aaplya dari programe in shirdi why not in ahmednagar)

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. या बैठकीनंतर मंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 11 ऑगस्ट रोजी शिर्डीत होतो. मात्र, शासनाचा एवढा मोठा कार्यक्रम असताना तो जिल्ह्याच्या ठिकाणी न होता शिर्डी येथे होत असल्याने टीका होते याविषयी विचारले असता ते म्हणाले, प्रथम हा कार्यक्रम नगर शहरातील वाडियापार्क येथे होणार होता. मात्र पावसाळी हवामानामुळे समस्या निर्माण होऊ शकत होत्या. तसेच शिर्डी येथे विमानतळ असल्याने व खराब हवामानामध्ये हेलिकॉप्टर उड्डाण व लॅण्डिंगमध्ये अडचणी आल्या असत्या यामुळे हा कार्य्रक्रम शिर्डी येथे होत आहे. बाकी नगरमध्ये आपण हा कार्यक्रम घेत नाही यामागे दुसरे कोणतेही कारण नाही, असं स्पष्टीकरण विखे यांनी दिले

नगर विमानतळ प्रश्नावर भाष्य टाळले
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगरमध्ये न होता शिर्डी येथे होतो आहे. मात्र विमानतळाचा मुद्दा घेत हा कार्यक्रम शिर्डी येथे घेतो आहे, असे विखे म्हणाले. मात्र यावेळी विखे यांना नगर शहरातील विमानतळाचा प्रलंबित मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर विखे यांनी भाष्य करणे टाळले. विखे म्हणाले, आपला कार्यकम शासन आपल्या दारी हा आहे आपण यावर भाष्य करू. बाकी या विषयावर आपण नंतर चर्चा करू असे म्हणतच त्यांनी या महत्वाच्या प्रश्नावर भाष्य करणे टाळले.

…त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत थेट हनुमान चालिसाच म्हटली 

शिर्डीमध्ये ठरलेला शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळं मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळं हा कार्यक्रम पुढं ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. ६ ऑगस्ट रोजी होणार हा कार्यक्रम ७ ऑगस्ट रोजी होणार म्हणून तयारी सुरु करण्यात आली. त्यानंतर आता ११ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमासाठी तब्बल 30 हजार जनता शिर्डी येथे उपस्थित राहणार आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व विभागांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या 616 बसेस जिल्हाभरातील ‘लाभार्थ्यांपर्यंत’ पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube