Kolhapur : सांगलीनंतर कोल्हापुरात दरोडा; अंधाधुंद गोळीबार करत लुटले दोन कोटींंचे दागिने

  • Written By: Published:
Kolhapur : सांगलीनंतर कोल्हापुरात दरोडा; अंधाधुंद गोळीबार करत लुटले दोन कोटींंचे दागिने

Kolhapur  Robbery : सांगलीची दरोड्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरात देखील दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला आहे. कोल्हापूर – गनबावडा रोडवरील मलिंगा गावात अंधाधुंद गोळीबार करत दोन कोटी रुपये किमतीचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले. दुकानात ग्राहक असताना आणि भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला असून पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या मागावर रवाना झाली आहेत. (Robbery in Kolhapur after Sangli; Jewels worth two crores were looted by indiscriminate firing)


चोरट्यांनी 400 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2 किलो इमिटेशन ज्वेलरी चोरली. त्यावर साधारणपणे 100 ग्रॅम सोन्याची पॉलिश आहे. या सर्वांची बाजारभावानुसार दोन कोटी इतकी किंमत असू शकते. तीन दरोडेखोरांनी काउंटरवर अंधाधुंद गोळीबार करत. यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काउंटरवर लावलेले दागिने काढून दिले. हे दागिने त्यांनी पटापट पिशवीमध्ये भरून दुचाकीवरून पळ काढला. साधारण 400 ग्रॅम वजनाचे दागिने चोरण्यात आले.

IAS अनिल रामोडला लाच घेताना पुण्यात अटक : घरातील नोटा मोजण्यासाठी सीबीआयने आणले दोन मशीन

चार दिवसापूर्वी सांगली शहरामधील वसंत कॉलनी येथील रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरूमवर पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रविवारी भर दिवसा दरोडेखोरांनी गोळीबार करत शोरूममधून 13 कोटी रुपये किमतीचे दागिने लुटले होते. चार दिवसात कोल्हापूर – सांगलीत ही दुसरी घटना आहे. त्यामुळे चिंता वक्त केली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनावरती देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube