सातारा बँकेसाठी महायुतीमध्ये घमासान ! फलटणमध्ये रामराजे-रणजितसिंह भिडणार
Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप स्वबळावर लढेल, असे संकेत दोन दिवसांपूर्वीच गोरे यांनी दिलेत.
Satara District Bank Election: राज्यातील अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीच आमने-सामने येणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Satara District Bank Election) जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहे. जिल्हा बँकेवर कमळ (BJP) फुलविण्यासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना आखली गेलीय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी थेट भाजप स्वबळावर लढविण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. त्यावरून महायुतीमध्ये बँकेसाठी लढत होऊ शकते. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका काय आहे ? फलटणमध्ये रामराजे निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांमध्ये लढत होणार का ? हे जाणून घेऊया…
जामखेडच्या कला केंद्रातील वाद अन् गर्भवती महिलेची हत्या, पिंकी काटकर हत्या प्रकरणात चौघांना अटक
जिल्हा बँकेतील 21 जागांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहे. परंतु महायुती होणार का याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मागील निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. परंतु निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडताना पक्षीय भूमिका घेण्यात आलीय.
जयकुमार गोरे यांची स्वबळाची भूमिका
या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वेगळी राजकीय भूमिका आहे. जिल्हा बँकेत भाजप स्वबळावर लढेल, असे संकेत दोन दिवसांपूर्वीच गोरे यांनी दिलेत. गोरे यांच्या रणनितीमुळे सातारा झेडपीवर भाजपचा अध्यक्ष झालाय. त्यामुळे बँकेतही भाजपचे एकहाती वर्चस्व राहावी, अशी भूमिका गोरे यांची आहे. तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अद्यापही कुणाशी चर्चा झाली नसून, सर्व नेते एकत्र येवून निर्णय घेतील, अशी भूमिका घेतलीय. तर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजकारण बँकेच्या बाहेर ठेवा अशी भूमिका उदयनराजेंची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे.
राष्ट्रवादीला, शिवसेना महायुती हवी वाटते महायुती व्हावी
राष्ट्रवादी काँग्रेसमधून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील महायुती व्हावी यासाठी उत्सुक आहे. त्यात उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मकरंदआबा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सुखावलीय. शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्हा बँकेच्या राजकारणापासून दूर आहेत. त्यांना बँकेत एन्ट्री हवी आहे. त्यामुळे त्यांना महायुती हवी आहे.
Sharad Pawar On NDA : तुम्ही भूमिका बदलणार अन् एनडीएत जाणार? शरद पवार म्हणाले…
रामराजे निंबाळकरविरुद्ध रणजितसिंह निंबाळकर
फलटणमधील बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे एकमेंकाविरुद्ध उभे ठाकणार आहे. बँकेच्या निवडणुकीत मी दोन अर्ज भरणार आहे. माजी खासदार कुठून अर्ज भरत आहेत त्याची वाट बघतोय, असे थेट आव्हान रामराजे यांनी रणजितसिंह यांना दिले आहे. त्यामुळे या तालुक्यात मात्र महायुती होऊ शकत नाही, असे तरी चित्र आहेत. तसेच पाटणमध्ये शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर, वाईमध्ये मकरंदआबा पाटील व मदनदादा भोसले एकत्र येऊ शकत नाहीत.
त्यात मंत्री गोरे, निंबाळकर वगळून शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखालील महायुती असा रामराजेंचा फार्म्यूला दिसतोय. परंतु भाजपची भूमिका वेगळी असल्याने हा फार्म्युला अस्तित्वात येऊ शकत नाही.
भाजप वगळून राष्ट्रवादी शिवसेनेची युती
महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीबाबत शांतता आहे. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही स्वतंत्र पॅनेल देऊ शकते. त्यातून महायुतीमध्ये फाईट होण्याची शक्यता अधिक आहे.