घरातील महिलेने धाडस दाखविले, पण कुटुंब प्रमुख…शरद पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

  • Written By: Published:
घरातील महिलेने धाडस दाखविले, पण कुटुंब प्रमुख…शरद पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

Sharad Pawar On Hasan mushrif: कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अजित पवार गटाबरोबर गेलेले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचाही जोरदार समाचार घेतला आहे. मुश्रीफांवर हल्ला करताना पवारांनी थेट त्यांच्या घरातील महिलांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेचा आधार घेतला आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता नको, पक्षांतर बंदी कायदा कडक करा; शाहू महाराजांचा हल्लाबोल

शरद पवार म्हणाले, काही लोकांना ईडीच्या नोटिसाचा दम दिला गेला आहे. काही लोकांनी त्याचा सामना केला आहे. कोल्हापुरचा इतिहास शौर्याचा आहे. येथे शूर लोक राहतात. परंतु ईडीची नोटीसा आल्यानंतर सामोरे जायची ताकद ते दाखवतील असे वाटत होते. कल्पना होती. काही तरी वेगळेच घडले आहे.कोल्हापुरात कुणाला तरी नोटीस आली आहे. कुणाच्या तरी घरी सीबीआयचे लोक गेले आहेत. कुणाला तरी इन्कम टॅक्सचे नोटीस आली. आमच्याबरोबर असलेल्या लोकांचा काही तरी स्वाभिमान असेल असे वाटत होते, असा टोलाही पवारांनी मुश्रीफांना लगावला आहे.

‘नो कॉमेंट्स… मला यावर काहीच बोलायचं नाही’; शरद पवारांचा विषय अजितदादांनी एका वाक्यात संपवला

घरातील महिलांना सांगितले, ज्या पद्धतीने आमच्यावर हल्ले करत आहेत. आमच्यावर धाडी घातल्या जात आहे. याच्यापेक्षा आमच्यावर गोळ्या झाडा असे एक भगिनी म्हणू शकते. पण घरातील कुटुंबाच्या प्रमुखांनी म्हटलेले मी एेकलेले नाही. जे धाडस भगिनीने दाखविले. तो धाडस दाखविण्याएेवजी आपण ईडीचे दरबारात जाऊ बसू. भाजपच्या दरबारात जावून बसू ते म्हणलेत. सुटका करून घेऊ ही भूमिका घेतल्याचा टोलाही पवारांनी लगावला आहे.

कोल्हापुरच्या कारवाईची मी तक्रार करणार नाही

देशाच्या पंतप्रधानांनी एका भाषणात काँग्रेस एक नंबर नंबरचा भ्रष्टाचारी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीला दोन नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. कोल्हापुराबाबत कारवाई केली असेल तर मी काही तक्रार करणार नाही. असा भ्रष्टाचार कुणी केलेला असेल, तर तो कुठलाही पक्षाचा, राज्याचा असेल तर योग्य कारवाई करा. पण ते काम न्यायालयाने केले पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे आम्ही या अशा सरकारला धडा शिकविला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube