पवारांची पॉवर! भाजपला धक्का, मोहिते पाटील हाती घेणार ‘तुतारी’; ‘माढ्या’चा शिलेदारही फिक्स?

पवारांची पॉवर! भाजपला धक्का, मोहिते पाटील हाती घेणार ‘तुतारी’; ‘माढ्या’चा शिलेदारही फिक्स?

Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) देण्याचे संकेत दिले होते. मात्र त्याआधीच जानकरांनी महायुतीतून तिकीटही मिळवलं. या घडामोडींनंतर पवार गटाची सगळी भिस्त महायुतीतील नाराज मोहिते पाटील कुटुंबावर आहे.

मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पवार गटासाठी गुडन्यूज मिळाली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या शरद पवारांबरोबर मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे उद्याच धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्याचे शरद पवार गटात घाटत आहे.

Vijaysinh Mohite–Patil & Sharad Pawar : मोहिते पाटील तीन वर्षानंतर शरद पवारांच्या शेजारी बसले!

मोहिते पाटील यांची पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यादृष्टीने शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात होते. तसेच भाजपकडूनही मोहिते पाटील यांची नाराजी घालवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, यात भाजपला यश आले नाही. मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला सोडचिठ्ठी दिली तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपातच राहणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवार गटात प्रवेश करतील.

दरम्यान, धैर्यशील मोहितेंकडून महायुतीकडे उमेदवारीची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा मैदानात उतरवले. यानंतर मोहिते पाटील कुटुंबीय कमालीचे नाराज झाले होते. त्यांच्याकडून भाजपविरोधात रान उठवण्यास सुरुवात झाली. तरी देखील त्यांनी काही दिवस वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दुसरीकडे शरद पवाारांनाही या मतदारसंघात मनासारखा उमेदवार मिळत नव्हता. मध्यंतरी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली होती.

त्यावेळी त्यांना उमेदवारीचे संकेत शरद पवारांनी संकेत दिले होते. परंतु, पुढे काही घडायच्या आत महादेव जानकर यांनी पुन्हा महायुतीशी घरोबा केला. या घडामोडींमुळे शरद पवार गटाने नवीन डाव टाकण्यास सुरुवात केली. आता मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यास जवळपास तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांना उद्याच पक्षप्रवेश देऊन उमेदवारीची घोषणा करण्याचं प्लॅनिंग शरद पवारांनी आखलं आहे.

CM शिंदेंचे आमदार शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज