शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत विखेंची बैठक
Vikhe meeting with Kisan Sabha delegation for pending demands of farmers : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. किसान सभेने शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २६ ते २८ एप्रिल या कालावधीत अकोले ते प्रवरा लोणी असा लॉन्ग मार्च काढला आहे. किसान सभेच्या आंदोलनाचे निमंत्रक कॉम्रेड डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांच्या मार्गदर्शनाखाली हे लाल वादळ प्रवरा लोणीच्या दिशेने निघाले आहे. या मोर्चाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी) संगमनेर येथील प्रांत कार्यालयात (Sangamner District Office) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा हा मोर्चा आज संगमनेर तालुक्यात दाखल झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. त्यादृष्टीने किसान सभेच्या शिष्टमंडळाशी राज्य सरकारने विशेष बैठक घेण्याचे ठरविले. त्यानुसार आज संगमनेर येथील प्रांत कार्यालयात बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित संगमनेरमध्ये दाखल झाले आहेत. तर किसान सभेने चर्चेसाठी ३३ जणांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. कांद्याला ६०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्या, किमान दोन हजार रुपये दराने नाफेड मार्फत खरेदी करा, गायरान, बेनामी, देवस्थान, इनाम, वक्फ बोर्ड आदी आकारीपड जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, आदी प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
ही तर अमित शाहांची सरळ धमकीच ! काँग्रेसची बाजू घेत राऊतांचा भाजपवर हल्ला
किसान सभेच्या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, चंद्रकांत गोरखाला, किसन गुजर, रडका कलांगडा, यशवंत झाडे, उद्धव पोळ, माणिक अवघडे, रमेश चौधरी, चंद्रकांत वरठा, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशिव साबळे, किरण गहला, डॉ. अशोक थोरात, संगीता साळवे, सुनीता पथवे, नामदेव भांगरे, सचिन दाजणे, नर्मला मांगे, रंजना पऱ्हाड, डॉ. करण घुले, नंदू डहाळे, संतोष वाडेकर, आण्णासाहेब शिंदे, अनिता साबळे यांचा समावेश आहे.
दरम्यान, आता या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नेमका काय तोडगा निघतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.